InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

बनावट कागदपत्र तयार करुन भूखंड बळकावल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 11 कोटी रुपये किंमतीच्या वादग्रस्त भूखंड खरेदी-विक्री प्रकरणात हा गुन्हा नोंदविला गेला.

आयुषी किरण देशमुख यांनी या प्रकरणी आधी पोलिसात फिर्याद दिली. परंतु राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हा नोंदविणे टाळल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणून आयुषी यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे हे यात प्रमुख आरोपी आहेत. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156 (3) अन्वये प्रकरण न्यायालयात आल्यास सहसा न्यायालय पोलिसांना प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देते. परंतु 11 कोटी रुपये किंमतीच्या 9241 चौरस फूट जागेच्या या प्रकरणात थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply