Freddy | कार्तिक आर्यन च्या ‘फ्रेडी’ चित्रपटाचे फर्स्ट लूक रिलीज

मुंबई: भुलभुलय्या 2 या चित्रपटाच्या माध्यमातून यावर्षी चर्चेत आलेला बॉलीवूड Bollywood चा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन Kartik Aryan लवकरच ‘फ्रेडी’ Freddy चित्रपटात दिसणार आहे. कार्तिकच्या फ्रेडी चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू असून कार्तिकचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे. चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण फ्रेडी चित्रपटाशी संबंधित कार्तिक आर्याने नुकताच त्याचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये अजूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर फ्रेडी चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे.

फ्रेडी हा एक थ्रिलर चित्रपट असून कार्तिक आर्यन यामध्ये पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या फर्स्ट लूकच्या पोस्टचे कॅप्शन पाहतात फ्रेडी मध्ये कार्तिक डॉक्टर फ्रेडी जिनवालाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळत आहे.

फ्रेडी Freddy चित्रपटाचा फर्स्ट लूक

कार्तिक आर्यनने नुकतच त्याचा सोशल मीडिया अकाउंटव्दारे फ्रेडी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे चित्रपटातील पात्राचे नाव देखील सांगितले आहे. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे, “डॉक्टर फ्रेडी जिनवाला, अपॉइंटमेंट लवकरच सुरू होणार आहे.” कार्तिक आर्यन चा हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टला कार्तिक आर्यन फॅन क्लब कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटातील इतर कलाकार

शशांक घोष दिग्दर्शक चित्रपट फ्रेडी मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असून आलिया एफ त्याच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नसून ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.