InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गुगल मॅप वरून आता ऑटो रिक्षाच्या रुटसोबतच भाडेही कळणार

गुगल मॅप या ॲपमध्ये एक नवीन फीचर आणण्याची घोषणा केली आहे. आता या फीचरमुळे टॅक्सी, कॅब आणि ओलाप्रमाणे ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ मोडमध्ये गुगल मॅप ॲपवर ऑटो-रिक्षाचाही पर्याय दिसणार आहे.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गुगल मॅप ॲपवरून प्रवाशांना कुठपर्यंत जायचंय या माहितीसोबतच मार्ग आणि ऑटो-रिक्षाचे भाडे किती होणार आहे?, हे समजणार आहे. या नवीन ॲप फीचरमुळे प्रवास आणखी सोयीचा आणि सुखकारक होईल, असे गुगलने म्हटले आहे.

गुगल मॅपचे प्रॉडक्ट मॅनेजर विशाल दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दिल्लीत आजच्या घडीला अनोळखी रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांकडून गाडी चालक जास्तीच्या पैशांची मागणी करत असतात. दिल्लीत नवीन आलेल्या लोकांना बऱ्याचदा मार्ग माहिती नसतो त्यामुळे गुगल मॅपच्या या नवीन ॲपची त्यांना मदत होणार आहे.सध्या ही सेवा केवळ दिल्लीत असणार आहे. देशातील अन्य शहरात ही सेवा सुरू होणार आहे की नाही, याबाबत गुगल मॅपने अध्याप अधिकृत असे काही सांगितले नाही.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply