InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सेनेचे “ठाणे” दार केरळात..!

केरळ राज्यावर आलेल्या महापुराच्या अस्मानी संकटाने केरळचे कंबरडे मोडले आहे. पाण्याने संपूर्ण राज्यच गिळंकृत केल्यासारखी परिस्थिती केरळात आहे. यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याच आवाहन केरळातून होत असताना त्याला वेगवेगळ्या पक्ष, संस्था, सेलेब्रिटी आदींनी भरघोस मदत केली आहे. या केरळमधील पूरग्रस्तांसाठी ठाणे शिवसेनेने देखील आपला हात पुढे केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या चित्र प्रदर्शनासोबत सर्व आमदार-खासदार, मुंबई-ठाणे नगरसेवक आपले मानधन केरळसाठी देणार असल्याचे जाहीर केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply