InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Fruit- उन्हाळ्यात हि फळे खावीत

- Advertisement -

बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. म्हणून अशा दिवसात शरीराचे तापमान थंड ठेवणे गरजेचे आहे. यासाठी चव व थंडाव्याचा विचार करता अनेक फळे  बाजारात उपलब्ध आहेत. यापासून शरीराला आवश्यक घटक मिळतातच सोबत शरीराचे तापमानही प्रमाणात राहते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात फळे खाणे सर्वोत्तम आहे.
काकडी: काकडीमध्ये सर्वाधिक पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहण्यास मदत होते.
लिंबूवर्गीय फळे: लिंबामुळे शरीराला थंडावा मिळण्याबरोबरच शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे लिंबाचे सेवन करावे.
कलिंगड : कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात कलिंगड शरीरासाठी वातानुकूलित यंत्रणेसारखे काम करते.

- Advertisement -

पीच: हे पाणीदार फळ असल्याने यामध्ये ‘ए’ आणि ‘सी’ जीवनसत्त्व अधिक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ नक्कीच खाल्ले पाहिजे.
अननस: ब्रोमेलेन नावाचे एन्झाईम फक्त अननसात आढळून येतात. त्यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते.
नारळ: शरीराला थंडावा देणे आणि पोषक घटकांचा समावेश हे नारळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे दिवसभरात एकदा नारळाचे पाणी पिल्यास शरीराला फायदा होतो.
सफरचंद : पीनट बटरबरोबर सफरचंद खाल्ल्यास उत्तम न्याहारी होऊ शकते. त्यामुळे पोटाला गारवा मिळतोच पण पोटही भरते.
पुदिना : पुदिना हि स्वस्त आणि कुठेही सहजतेने मिळू शकणारी वनस्पती आहे. यामध्ये थंडावा अधिक असतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.