InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

कांद्यासोबत आता बटाट्याच्या दरातही वाढ

कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं असतानाच आता बटाट्याचे दरही हळूहळू वाढत  आहेत. घाऊक बाजारात बटाट्याचा भाव 28 ते 29 रुपये प्रतिकिलो झाला आहे, तर किरकोळ दर हा 35 ते 40 रुपयांवर गेला आहे.

भाज्या संपल्यावर अडीअडचणीला धावून येतो तो बटाटा. काही जणांना प्रत्येक भाजीत बटाटे घालण्याची आवड असते. तर अनेक फास्टफूडच्या पदार्थांतही बटाटा असतो. मात्र बटाट्यालाही महागाईचा फटका बसलेला दिसत आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे आर्थिक समीकरण बिघडवले. त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Loading...

गेल्या आठवड्यात ठोक बाजारात बटाटे 10 ते 12 रुपये प्रतिकिलो होते, तर किरकोळ बाजारात बटाटे 18 रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र आता घाऊक बाजारात बटाटा 28 ते 29 रुपयांवर गेला असून किरकोळ बाजारात तो 35 ते 40 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.

- Advertisement -

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.