पवारांसमोर गडकरी म्हणाले, साहेब आम्हाला ‘त्या’ गोष्टीची लाज वाटते

अहमदनगर : आज अहमदनगरमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ते विकासकामांची भूमीपूजनं तर काही कामांचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले कि, नितीन गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरिच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल.

त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते, म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादानमुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा