Gajanan Kale | ‘केम छो’च्या नंतर ‘कईसन बा’चा प्रयोगासाठी छोटे पप्पू रवाना ; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

Gajanan Kale | मुंबई : शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज (बुधवार) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत. या बातमीने बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात देखील चर्चेला उधाण आले आहे. आदित्य यांची तेजस्वीसोबतची ही खासगी भेट असेल, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यामागे कोणत्याही प्रकारे राजकीय हेतू नाही. मात्र राज्यात राजकीय चर्चांना उत आला आहे. मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

“तर मग आता ‘केम छो’च्या नंतर ‘कईसन बा’चा प्रयोग करण्यासाठी महाराष्ट्राचे छोटे पप्पू रवाना. १०० खोके वसुलीच्या भरघोस यशानंतर आता १०० खोक्यांच्या चारा घोटाळ्याच्या शिकवणीसाठी घेणार घोटाळेबाजांची सदिच्छा भेट”, असे खोचक ट्वीट गजानन काळे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात अनेक सभा त्यांनी घेतल्या. या सभांमधून त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. इतर पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील आदित्य ठाकरे घेत आहेत. अलीकडेच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला आणि राहुल गांधींचीही भेट घेतली. आता ते बिहारमध्ये गेले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी तसेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आदित्य आणि तेजस्वी यांच्यात चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.