Gajanan Kale | पवारसाहेबांनी काकूंना पाठवून शिल्लक सेनेचा गेम केला – गजानन काळे

Gajanan Kale | मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेतून विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. भाजप आणि शिंदे गटावर सुषमा अंधारे सडकून टीका करत आहेत. दरम्यान त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. पोलिसांवर टीका करताना सुषमा अंधारे  (Sushma Andhare) यांनी  राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा देखील उल्लेख केला. त्यामुळे मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

“अंधारे काकू व शिल्लक सेनेत बरेच बेअक्कल भरलेत. राजसाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जेवण जात नाही आहे. तो पक्ष संजय राऊतांनी संपवला, उरलेला तुम्ही वायफळ बोलून संपवणार. पवारसाहेबांनी काकूंना पाठवून शिल्लक सेनेचा गेम केला असं दिसतय,” अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे –

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा काल सिंधुदुर्गातील कणकवली येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी सभा घेतली. दरम्यान त्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. “तुम्ही पंतप्रधानांची नक्कल करता म्हणून तुमच्यावर केस टाकल्याचे पोलीस सांगतात. आता पोलीस डिपार्टमेंटचा कॅमेरा चालू आहे. पण या डिपार्टमेंटच्या कॅमेऱ्याला एक गोष्ट दिसत नाही का. आमचे चुलत भाऊ असणारे राज भाऊ (राज ठाकरे) यांचा नकालांमध्ये कुणी हात धरेल का?, त्यांच्यावर केस टाकण्याची पोलिसांनी हिंमत केली का?”, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.