“राज्यात भाजपचं सरकार यावं ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील”

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या सर्वांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. मात्र राज्यात यावर्षी देखील कोरोनामुळे गणपती उत्सवावर सरकारने निर्बंध लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात केली. महाजनांच्या पत्नी नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, कन्या श्रेया यांच्यासह सहकुटुंब पूजा करण्यात आली.

मात्र यावेळी महाजननांनी श्रींच्या चरणी वेगेळीच मागणी मागितलीय. त्यांच्या या मागणीमुळे मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्यात. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार यावे. ही श्रींची इच्छा आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात कोणीच सुखी नाही. असा टोला गिरीश महाजन यांनी आघाडी सरकारला लगावला आहे. गणरायाच्या आगमनाचे औचित्य साधत आ. गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला कोपरखळी मारली आहे.

तसेच भाजपची सत्ता यावी असं जनतेला वाटतं आहे आणि गणरायाचीही तिच इच्छा आहे. त्यामुळे आपण त्यांना सरकार बदलण्याचे साकडं घालणार नाही. गणरायाचं आता सरकार बदलण्याची इच्छा पूर्ण करून, राज्यात लवकरच भाजपचं सरकार येईल. तसेच राज्यातील अतिवृष्टी आणि दुष्काळ अशी निर्माण झालेली विचित्र परिस्थिती दूर व्हावी. कोरोनाचे संकट कायमचं जावं, सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी लाभावं यासाठी गणरायाला साकडं घातल्याचं महाजनांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा