Gandhi Godse Ek Yudh | ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज, पाहा Video
Gandhi Godse Ek Yudh | मुंबई: ‘घायल’, ‘दामिनी’, ‘खाकी’ यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) प्रदीर्घ काळानंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तब्बल नऊ वर्षानंतर राजकुमार संतोषी सिनेसृष्टीत परतले आहे. राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. 2.18 मिनिटांच्या या पोस्टरमध्ये अनेक ह्रदयस्पर्शी संवाद आहेत.
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील विचारधारण्याचे युद्ध दाखवण्यात आले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची ओळख करून देण्यात आली आहे. महात्मा गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली आहे. तर, नथुराम गोडसे यांची भूमिका चिन्मय मांडलेकर साकारत आहे. या चित्रपटामध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवण्यात आले आहे.
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची कथा राजकुमार संतोषी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट संतोषी प्रोडक्शनचा बॅनरखाली निर्मित केला गेला आहे. 26 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेवर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यावर आधारित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे शरद पोक्षे यांचं नाटक चांगलंच गाजलेलं होतं. त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या माध्यमातून या विचारधारा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojana | नवीन वर्षातील ‘या’ महिन्यात मिळेल शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 13 वा हप्ता
- Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केसांना कोमट तेल लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे
- IND vs SL | बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व
- Winter Session 2022 | “दरमहा २० हजार निवृत्ती वेतन…” ; सीमा भागातील मराठी नागरिकांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
- Winter Session 2022 | सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठरावात नेमकं काय? वाचा एका क्लिकवर…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.