Gandhi Godse Ek Yudh | ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार राजकुमार संतोषीचा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’

Gandhi Godse Ek Yudh | मुंबई: “घायल”, “दामिनी”, ” खाकी” यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) प्रदीर्घ काळानंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तब्बल नऊ वर्षानंतर राजकुमार संतोषी सिनेसृष्टीत परतले आहे. राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. नुकतीच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेवर आधारित आहे. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची निर्मिती संतोषी प्रोडक्शन आणि पीव्हीआर पिक्चरने केली आहे. राजकुमार संतोषी यांनी चित्रपटाची घोषणा करताना चित्रपट प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. पण त्यांनी या चित्रपटातील कलाकारांबद्दल अद्याप कोणती माहिती दिलेली नाही.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटांमध्ये पवन चोप्रा आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर महत्त्वाच्या भूमिका साकारू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. कारण चिन्मयने या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेवर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. यावर आधारित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे शरद पोक्षे यांचं नाटक चांगलंच गाजलेलं होतं. त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या माध्यमातून या विचारधारा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.