राहून गांधींकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद?

मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज दिल्लीत सुरू आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या बैठकीमधून सोनिया गांधींनी पक्षातील जी-23 नेत्यांना एक सूचक संदेश दिला आहे. आगामी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारीणीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

या बैठकीला पक्षाचे 52 वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. तसेच आज पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारणीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी उचलून धरली. त्यावर राहुल गांधी यांनी ‘मी विचार करेन’ असे सकारात्मक उत्तर दिले आहे. त्यामुळे कदाचित राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारतील, अशी दाट शक्यता आहे.

या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, के सी वेनुगोपाल, रणदीप सिंग सुरजेवाला, गुलाम नबी आझाद, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल व पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासहीत ५१ नेते या बैठकीला हजर होते. यावेळी अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्यात यावे अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा