गणेश चतुर्थी : पहा गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची यादी

उद्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता सगळ्यांनाच असते. यंदा लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरच्याघरी  उत्साहानं गणपती बाप्पांचे स्वागत आणि पूजा अर्चा करणार आहे. तुम्हाला आज गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना आणि पूजेसाठी कोणकोणती साधनसामग्री आवश्यक असते याबाबत सांगणार आहोत.

पूजेसाठी लागणारी साधनसामग्री :-

कुंकू,  हळद, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्रे, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.

आता वर दिलेली सामान बाजारातून लवकरात लवकर लॉकडाऊनच्या काळात काळजी घेऊन आणून ठेवल्यास ऐनवेळी तुमची गैरसोय होणार नाही. आणि तुम्हाला उद्याच्या दिवशी धावपळ देखील करावी लागणार नाही. 

महत्वाच्या बातम्या :-

सुशांत प्रकरणात CBI करणार सीन रिक्रिएट ; सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी घातले गजाननाकडे साकडे

नियोजनशुन्यतेमुळे कोकणी माणसाच्या गणेशोत्सवाचा विचका झालाय ; भाजपचा आरोप

राम मंदिराचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करा ; मुख्यमंत्र्यांचा सल्ला

पवार VS पवारमध्ये पार्थ पवार सरस ; सत्यमेव जयतेचा केला जयघोष !

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा