Garlic and Onion | कांदा आणि लसणाचा खास हेअरमास्क वापरल्याने केसांना मिळतात ‘हे’ फायदे

Garlic and Onion | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येकालाच दाट, मजबूत आणि निरोगी केस हवे असतात. यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापर करतात. मात्र हे प्रॉडक्ट केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या लसूण आणि कांद्याची मदत घेऊ शकतात. कांदा आणि लसनाचा हेअरमास्क वापरल्याने केसांना अनेक फायदे मिळू शकतात. कारण या दोन्हीमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, जे केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. हा हेअरमास्क बनवण्यासाठी तुम्हाला लसणाच्या दोन-तीन पाकळ्या आणि सोललेल्या कांद्याचे दोन तीन तुकडे घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये ते चांगले बारीक करून घ्यावे लागेल. ही पेस्ट तयार झाल्यावर तुम्हाला त्यामध्ये ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब मिसळावे लागेल. हे मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण 15 ते 20 मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. तुम्ही या मिश्रणाचा आठवड्यातून तीन वेळा वापर करू शकतात. या मिश्रणाचा वापर केल्याने केसांच्या पुढील समस्या सहज दूर होतात.

केस गळती कमी होते (Hair fall is reduced-Garlic and Onion Hairmask)

तुम्ही जर केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल तर लसूण आणि कांद्याचा हेअरमास्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या मिश्रणाचा वापर केल्याने केसांच्या वाढीस चालला मिळते आणि केस गळती देखील थांबते. कांद्यामध्ये आढळणारे गुणधर्म केस गळती थांबवण्यास मदत करतात.

केसांची चमक वाढते (Hair shine increases-Garlic and Onion Hairmask)

केसांना निरोगी, दाट, मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी हा हेअरमास्क उपयुक्त ठरू शकतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केस निरोगी राहू शकतात आणि केसांची चमक देखील वाढू शकते.

कोंडा दूर होतो (Removes dandruff-Garlic and Onion Hairmask)

तुम्ही जर केसातील कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी उपाय शोधत असाल, तर लसूण आणि कांद्याचा हेअरमास्क तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या दोन्ही गोष्टींमध्ये आढळणारे गुणधर्म टाळू स्वच्छ करते आणि केसातील कोंडा कमी करते. टाळू आणि केसांमध्ये घाण असल्यामुळे कोंडयाची समस्या वाढत जाते. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते.

लसूण आणि कांद्याचा हेअरमास्क वापरल्याने केसांना वरील फायदे होऊ शकतात. त्याचबरोबर केसांच्या वाढीस चालना  देण्यासाठी तुम्ही खालील सोप्या टिप्स वापरू शकतात.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता (Coconut oil and curry leaves-For Hair Growth)

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल आणि कढीपत्ता उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये सात ते आठ कढीपत्ते मिसळावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे तेल कोमट करून घ्यावे लागेल. या तेलाने केसांना हलक्या हाताने मसाज केल्यावर केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा या तेलाचा वापर करू शकतात.

मोहरीचे तेल आणि मेथी (Mustard oil and fenugreek seeds-For Hair Growth)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि मेथीचा वापर करू शकतात. कारण या दोन्हीमध्ये विटामिन ई, अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या दाण्याची पेस्ट तयार करून मोहरीच्या तेलामध्ये मिसळून घ्यावी लागेल. हे तेल तुम्हाला साधारण एक तास केसांना लावून ठेवावे लागेल. एका तासानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागतील.

खोबरेल तेल आणि कोरफड (Coconut Oil and AloeVera-For Hair Growth)

तुम्ही जर केस वाढवण्याचा विचार करत असाल, तर खोबरेल तेल आणि कोरफडीचे मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवश्यकतेनुसार कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण हलक्या हाताने केसांना लावावे लागेल. साधारण एक तास हे मिश्रण केसांवर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस मऊ, लांब आणि चमकदार होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like