Gatari Amavasya | भाजपतर्फे गटारीनिमित्त मोफत कोंबडी वाटप! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Gatari Amavasya | मुंबई: राज्यामध्ये गटारी अमावस्या एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. गटारी अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये बहुतांश लोक मासाहाराचे सेवन करत नाही. त्यामुळे गटारी अमावस्येच्या दिवशी लोक मनसोक्त मांसाहार खातात. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. गटारी अमावस्येनिमित्त भाजप मोफत कोंबडी वाटप करणार असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

BJP will distribute free chicken at Prabhadevi Naka in Mumbai today at 6 pm

भाजपच्या कोकण विकास आघाडीच्या नावानं हा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील प्रभादेवी नाका येथे भाजपतर्फे मोफत कोंबडी (Gatari Amavasya) वाटप करण्यात येणार असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

मुंबई सचिव सचिन शिंदे, भाजप नेते बबन तोडकर आणि चेतन देवळेकर यांची नावं देखील या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आशिष शेलार यांच्यासह भाजप नेत्यांचा फोटो वापरण्यात आला आहे. या मेसेजनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या मेसेजची पुष्टी करण्यासाठी सचिन शिंदे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे.

अशा स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम मी आयोजित केलेला नाही. गेली अनेक वर्ष मी दादर माहीम विभागात कार्यरत आहे. या विभागात मी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहे. मात्र अशा स्वरूपाचा उपक्रम मी कधीच राबवलेला (Gatari Amavasya) नाही.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कार्यक्रमाला माझा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा किंवा सहकार्य नाही. माझं नाव घेऊन कोणीतरी हा मेसेज सोशल मीडियावर पसरवला (Gatari Amavasya) आहे. मी स्वतःच या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मला त्रास देण्यासाठी कोणीतरी मुद्दाम हा प्रकार केला आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PU0wAl

You might also like

Comments are closed.