InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गौरव गिलच्या गाडीला स्पर्धेदरम्यान अपघात, तिघांचा दुर्देवी मृत्यू

- Advertisement -

अर्जुन पुरस्कार विजेता फॉर्म्युला वन कार रेसिंग ड्रायव्हर गौरव गिलच्या गाडीला स्पर्धेदरम्यान अपघात झाला. नॅशनल रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेवेळी ट्रॅकवर आलेल्या दुचाकीला धडक बसल्यानं एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. गौरव गिलला दुखापत झाली आहे. गिलला नुकताच अर्जुन पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच चालक ठरला होता.

- Advertisement -

Loading...

गौरव गिलच्या गाडीला शनिवारी एफएमएससीआय इंडियन रॅली चॅम्पियनशिप 2019 च्या शर्यतीवेळी अपघात झाला. होतरडा गावाजवळ ट्रॅकवर समोरून आलेल्या दुचाकीनं धडक दिली. तहसीलदार राकेश जैन यांनी सांगितलं की, या अपघातात नरेंद्र, त्याची पत्नी आणि मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शनिवारी स्पर्धा रद्द करण्यात आली.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

एफएफएससीआयचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पृथ्वीराज यांनी सांगितलं की, सुरक्षेचा सर्व नियमांचे आणि अटींचे पालन केल्यानंतरही ट्रॅकवर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या वाईट काळात मोटरस्पोर्टस समुह त्यांच्यासोबत आहे असंही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.