Gautam Gambhir IPL 2023 | व्हायरल फोटोवर युजर्स म्हणतात गौतम गंभीरची होऊ शकते हकालपट्टी
Gautam Gambhir IPL 2023 | सध्या IPL 2023 चा शेवटचा टप्पा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी CSK उत्तम कामगिरी करत थेट फायनल मध्ये धडक मारली. तर काल (24 मे) एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (MI)या दोन संघात झाला. तर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स (LSG)81 धावांनी पराभव केला आहे. यामुळे हा संघ आता IPL मधून बाहेर पडला आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरचा ( Gautam Gambhir) मॅच हरल्यानंतरच फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरून त्याची संघातून कधीही हकालपट्टी होऊ शकते असं यूजर्स म्हणत आहेत.
गौतम गंभीर “या” फोटोवरून होतोय चांगलाचं ट्रोल
कालच्या ( 24 मे) मॅचदरम्यान मुंबई इंडियन्स ( MI) लखनौला ( LSG) 183 धावांचे लक्ष्य दिले होते परंतु, लखनौ सुपर जायंट्सला तो आकडा गाठता आला नाही. IPL च्या या सिजन मध्ये लखनौ (LSG) संघ वादाच्या भोवऱ्यात राहील आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याशी देखील संघाचा गोलंदाज नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात सामन्यादरम्यान वाद झाले त्यानंतर सोशल मीडिया लखनौ संघ चांगलाच ट्रोल झाला होता. तर कालचा सामना देखील काही छोट्या चुकांमुळे हातून गेला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर जो फोटो गौतम गंभीरचा (Gautam Gambhir)
व्हायरल होतो त्यावरून तो चांगलाच ट्रोल होत आहे.
https://www.instagram.com/p/CsovKJLvEKT/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
Gautam Gambhir Viral Photo
दरम्यान, व्हायरल फोटोमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) नाराज दिसत आहे. तर त्याच्या समोर लखनौच्या (LSG) टीमचे मालक संजीव गोएंका देखील उभे असून ते राग काहीतरी गंभीरला (Gautam Gambhir) बोलत असलायचं पाहायला मिळतं आहे. गोएंकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत आहे. यामुळे गौतम गंभीर आणि संजीव गोएंका चांगलाच व्हायरल होत असून गंभीरला (Gautam Gambhir) चांगलंच ट्रोल केलं जात आहे. यामुळे या फोटोवर युजर्स कंमेंट करत म्हणत आहेत की, त्याची कधीही संघातून हकालपट्टी होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
- Sudhir Mungantiwar | शिवसेनेचे 40 आमदार फुटतात, ठाकरेंचा काहीतरी दोष असेल ना? – सुधीर मुनगंटीवार
- NCP Leader | राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या गळाला लागणार; ‘या’ नेत्यांनं केलं खळबळजनक विधान
- Eknath Shinde | आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट
- Sadabhau Khot | शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन! सदाभाऊ खोत यांचा मोर्चा पुणे-बेंगलोर हायवेवर
Original NEWS SOURCE – https://bit.ly/426IT2D
Comments are closed.