Gautami Patil | गौतमीने बिहारमध्ये जाऊन गोंधळ आणि राडा घालावा- छोटा पुढारी

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. तिच्या कार्यक्रमाला कोणत्याही ठिकाणी तुफान गर्दी असते. मात्र, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादात सापडले. गौतमीच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात यावी अशी मागणी अनेकांकडून करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडे (Chhota Pudhari Ghanshyam Darode) याने गौतमीवर टीका केली होती. गौतमीनं महाराष्ट्राचा बिहार करू नये, असं त्यानं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा छोटा पुढारी याने गौतमीला इशारा दिला आहे.

Chhota Padari Ghanshyam Darode criticizes Gautami Patil

महाराष्ट्राचा बिहार करू नका असं छोटा पुढारी याने गौतमीला (Gautami Patil) म्हटलं होतं. मी महाराष्ट्राचा काय बिहार केला? असा प्रश्न गौतमीने उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देत छोटा पुढारी म्हणाला, “गौतमी ताईला महाराष्ट्राचा बिहार करायचा असेल तर तुम्ही बिहारमध्ये जाऊन नाचा. महाराष्ट्रामध्ये हे सर्व खपवून घेतले जाणार नाही. गौतमीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये दंगली होतात. तिच्या कार्यक्रमांमध्ये जनता पोलिसांना सुरक्षा देते.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “कार्यक्रमादरम्यान गौतमीला (Gautami Patil) सुरक्षा प्रदान केली जाते. मात्र, जनतेचं काय? कारण तिच्या प्रत्येक कार्यक्रमात दंगली आणि लाठीचार होतो. हे सर्व असंच चालत राहिलं तर एक दिवस तरुण मंडळी स्टेजवर येऊन दंगली घडवतील. त्यामध्ये गौतमीला देखील मारहाण होऊ शकते. स्टेजवर एका महिलेला मारहाण करणे हे महाराष्ट्रासाठी कलंक ठरू शकते. त्यामुळे गौतमीताई तुम्ही हे सगळं थांबवलं पाहिजे.”

दरम्यान छोटा पुढारी याने गौतमी पाटीलवर दुसऱ्यांदा टीका केली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेवर गौतमी काय उत्तर देईल, याकडं सर्वांचं लक्षं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/chhota-padari-ghanshyam-darode-criticizes-gautami-patil/?feed_id=40257&_unique_id=647484f6b8da4