Gautami Patil | “गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर…”; छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा गौतमी पाटीलला इशारा

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलने आपल्या डान्सने सर्वांना भुरळ घातली आहे. कोणत्याही ठिकाणी तिचा कार्यक्रम आयोजित केला तर तुफान गर्दी पाहायला मिळते. परंतु ती डान्समुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. अनेक कलाकारांकडून देखील तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. कारण लावणी ही लावणी राहिली पाहिजे त्याला अश्लीलतेचा रंग गौतमीच्या डान्समधून (Gautami Patil) चढत असल्याचं म्हटलं जात आहे. तर आता छोटा पुढारी घन:श्याम दराडेने ( Chhota Pudhari Ghanshyam Darode ) देखील गौतमी पाटीलवर टीका करत इशारा दिला आहे.

गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये –

घन: श्याम दराडेने यांचा मुसंडी हा चित्रपट येत आहे यामुळे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यासाठी तो आला होता. त्यावेळी घन:श्याम दराडे यांने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, “गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल”अशा शब्दात इशारा दिला आहे. याचप्रमाणे जी महाराष्ट्राची लावणी आहे त्या लावणीला लावणीचं राहू द्या त्याला अश्लीलतेच रंग चढवू नका अशी मी विनंती करतो असं देखील घन:श्याम दराडे म्हणाला.

दरम्यान, घनश्याम याने गौतमी पाटीलबद्दल म्हटलं की, आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करीत आहे. तसचं घन:श्याम दराडेने गौतमीला देखील ‘मुसंडी’  हा चित्रपट पाहावा असं आवाहन त्यावेळी केलं. याचप्रमाणे गौतमी  पाटीलच्या शो दरम्यान तरुणांच्या गटामध्ये हुल्लडबाजी होत असल्याची पाहायला मिळत असते त्यातून कार्यक्रमातदेखील गोंधळ निर्माण होऊन वाद होतात. यामुळे असा प्रकार बंद झाला पाहिजे असं देखील छोटा पुढारी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MG4cUb