Gautami Patil | गौतमी पाटीलचं खरं आडनाव माहित आहे का? नसेल माहित, तर जाणून घ्या

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. परंतु, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडते. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे.

Do you know Gautami Patil’s real surname?

गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. कारण गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून काहीतरी वेगळेच आहे. गौतमीचे खरे आडनाव चाबुकस्वार आहे. मात्र, गौतमी चाबुकस्वार ऐवजी पाटील हे नाव वापरते.

या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी गौतमीला (Gautami Patil) इशारा दिला आहे. “गौतमी पाटील हे नाव वापरून पाटील यांची बदनामी करत आहे. तिने हे आडनाव लावू नये”, असं राजेंद्र जऱ्हाड पाटील म्हणाले आहे.

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) कडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आपल्या आडनावाच्या वादावर गौतमी काय प्रतिक्रिया देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज (25 मे) संध्याकाळी सात वाजता गौतमीचा विरारमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर ती माध्यमांची बोलण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IF1UCs