Gautami Patil | गौतमी पाटीलचा ‘कार्यक्रम अन् राडा’ लागणार ब्रेक; पोलिसांनी लढवली शक्कल
Gautami Patil | सोलापूर : सबसे कातिल म्हणून गौतमी पाटील ( Gautami Patil ) ओळखली जाते. डान्सर गौतमीच्या कार्यक्रमाबाबत एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी जर तिचा कार्यक्रम असेल तर कार्यक्रम आयोजित करणाऱ्याच्या खिशाला कात्री लागणारं आहे. कारण गौतमीच्या कार्यक्रमा दरम्यान तुफान गर्दी होते. या गर्दीमुळे कधी दोन गटात राडा बघायला मिळतो तर कधी तरूणाईची हुल्लडबाजी. यामुळे स्थनिक पोलीस यंत्रणेवर देखील ताण निर्माण होतो. यासाठी पोलिसांनी शक्कल लढवली आहे. आता सोलापूरमध्ये जर गौतमीचा कार्यक्रम असेल तर गरजेनुसार पेड पोलीस बंदोबस्त देण्यास सुरुवात केली आहे. काल (19 मे) सांगोला तालुक्यातील घेरडी येथे अशाच पद्धतीचा पेड पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम पार पडला आहे.
Gautami Patil | पोलीस बंदोबस्तासाठी मोजले सव्वा पाच लाख रुपये
तसचं या पेड बंदोबस्तासाठी आयोजकांनी जवळपास सव्वा पाच लाख रुपये भरून १०० पोलीस कर्मचारी आणि ६ अधिकारी असा बंदोबस्त ठेवला होता. गौतमीच्या कार्यक्रमात होणारा दंगा, कार्यक्रम पाहायला आलेल्या महिला प्रेक्षकांना होणार त्रास आणि पोलिसांच्या समोर वारंवार उभा राहत असलेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही एक अलिखित अट कार्यक्रमाला परवानगी देताना ठेवण्यास सुरुवात केली आहे. याबद्दलची माहिती सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
Gautami Patil Program Cost
याचप्रमाणे आता गौतमी पाटीलला ( Gautami Patil ) कार्यक्रमासाठी एकाद्या गावात आणायची म्हटलं तरी तिच्या टीमचे मानधन, तिच्या व्हॅनिटी व्हॅनचा खर्च , कार्यक्रमाचा खर्च आणि यामध्ये आता पोलीस बंदोबस्तासाठीचा लाखो रुपयाचा खर्च वाढल्याने तिचा हा कार्यक्रम फक्त आर्थिक दृष्ट्या भक्कम असणाऱ्या आयोजकांच्याच खिशाला परवडणारा असणार आहे. तसचं गौतमी पाटील साठी देखील ही बातमी आर्थिक नुकसान करणारी असल्याचं सांगितलं जातं आहे. गौतमीची महाराष्ट्रात खूप मोठी क्रेज असल्याने तिचा चाहता वर्ग देखील जास्त आहे .
The organizers spend five lakh rupees for the police Protections
दरम्यान, अशाप्रकारे सांगोला तालुक्यातील घेरडी या गावामध्ये गौतमीचा ( Gautami Patil ) पहिला कार्यक्रम पार पडला. यामध्ये आयोजकांना १०० पोलीस कर्मचारी आणि ६ अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी तब्बल सव्वा पाच लाख रुपये मोजावे लागले आहे. यामुळे तिचा हा कार्यक्रम शांततेत झाला असल्याचं देखील बोललं जातं आहे. तर हा कार्यक्रम घेरडी येथील रासपचे नेते आबा मोठे यांच्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी 25 % महिलांनी देखील कार्यक्रम बघण्यासाठी हजेरी लावली होती. गौतमीच्या डान्सचा महिलांनी देखील आनंद लुटला असल्याचं सांगण्यात येत आहे. सोलापूर मधील या कार्यक्रमाच अनुकरण इतर जिल्ह्यामध्ये होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; 5 तास सीबीआयच्या चौकशीनंतर होऊ शकते निलंबन
- Ajit Pawar | “NCP मोठा अन् काँग्रेस लहान…”; अजित पवारांचा नाना पटोलेंना टोला
- Chhota Pudhari | नवरी नऊ अन् नवरदेव पन्नास, नवरी कुणाला कुंकू लावते त्यांनाच माहीत – घनश्याम दरोडे
- Devendra Fadnavis | “काळा पैसा जमा करून…”; नोटबंदी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
- Ashish Deshmukh | आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pTusS1
Comments are closed.