Gautami Patil | गौतमी पाटील गावात येणार म्हणून सुट्टी हवीय; एसटी चालकाच्या रजेचा अर्ज व्हायरलं

Gautami Patil | सांगली : गौतम पाटील (Gautami Patil) म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहतं नाद एकच एक बैलगाडा शर्यत या गाण्यावर थरथरणारी डान्सर गौतमी पाटील. सबसे कातील गौतमी पाटील म्हणून तिने आपल्या डान्समधून ओळख निर्माण केली आहे. तिच्या अदांनी महाराष्ट्रातल्या तरुणाईला अक्षरक्षः वेड लावलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात गौतमीचा (Gautami Patil Dance) कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी तिच्या डान्समुळे वाद देखील पेटला होता. लावणी कलाकारांकडून तिच्या कार्यक्रमानवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु वाऱ्यासारखी गौतमी पाटील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तिच्या नृत्यामुळे पोहोचली आहे. तर आता चक्क तिच्या एका चाहत्याने गावात गौतमी पाटील येणार असल्याने मला सुट्टी मिळावी असा अर्ज केला आहे. तो अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.

काय अर्ज करण्यात आला  आहे –

एका एसटी चालकाने चक्क असा अर्ज केला आहे की, गावात गौतमी पाटील (Gautami Patil) येणार आहे आणि दोन दिवसांची सुट्टी द्या. यामध्ये 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मिळावी असं रजा अर्जात नमूद केलं आहे. हा अर्ज सोशल मीडियावर (Socail Media) चांगलाच व्हायरल होत आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर समजलं की, सांगलीच्या तासगाव डेपोतला हा चालक आहे. परंतु नक्की त्याने अर्ज केला की दुसऱ्या कोणी त्याच्या नावाने अर्ज केला आहे. याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. तर रजेचा अशा प्रकारचा अर्ज तासगाव एसटी आगाराकडे कोणी केला नाही असं देखील सांगण्यात आगाराकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सांगलीच्या तासगाव एसटी डेपोतील चालकाचा रजेचा अर्ज चांगलाच व्हायरल होत असल्याने सांगलीच्या एसटी प्रशासनापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या व्हायरल होणाऱ्या अर्जावर नेटकऱ्याकडून जोरदार कंमेंट येत असून चर्चा रंगली आहे. मात्र, ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज लिहिण्यात आला आहे. तो बोगस अर्ज आहे की खरा हे अद्याप समजू शकले  नाही.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.