Gautami Patil | ‘पाटील’ हा एक किताब आहे; गौतमी पाटील आडनाव वादावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Gautami Patil | जळगाव: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी आपल्या नृत्यामुळे वादात सापडते. मात्र, यावेळी ती तिच्या नृत्यामुळे नाही, तर आडनावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मराठी संघटनांनी तिच्या पाटील आडनावावर आक्षेप घेतला आहे. गौतमीने ‘पाटील’ हे आडनाव वापरू नये अशी भूमिका काही संघटनांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sambhajiraje’s reaction to the Gautami Patil surname controversy

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “महिलांनी आपले कर्तृत्व आणि गुण दाखवायला पाहिजे. सर्वांनी त्यासाठी महिलांच्या पाठीशी उभे राहिला हवे. मराठा समाज नव्हे, तर अनेक समाजातील लोक पाटील आडनाव वापरतात. कारण पाटील हे आडनाव नसून किताब आहे. कलाकारांना (Gautami Patil) सुरक्षा मिळायला हवी.”

“छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना सन्मान आणि सुरक्षा दिली. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर महिलांना देखील स्वातंत्र्य आहे. म्हणून गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. कलाकारांना सुरक्षा मिळाली पाहिजे, हे माझं मात आहे”, असंही ते बोलताना म्हणाले.

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पकालावधीतच आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिने क्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43ydEhR

You might also like

Comments are closed.