Gautami Patil | “बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे…”; गौतमी पाटीलबद्दची शाहीर संभाजी भगत यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: सध्या महाराष्ट्रामध्ये नृत्यांगणा गौतमी पाटील हीच नाव प्रचंड चर्चेत आहे. कारण गौतमी पाटील नेहमी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालते. तिच्या कार्यक्रमाला कुठंही तुफान गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर ती तिच्या नृत्यामुळे वादात सापडते. याच पार्श्वभूमीवर शाहीर संभाजी भगत (Sambhaji Bhagat) यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.

Sambhaji Bhagat’s post about Gautami Patil goes viral

महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव सध्या खूप चर्चेत आहे. यादरम्यानच शाहीर संभाजी भगत यांनी गौतमीबाबत पोस्ट शेअर केली आहे. मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे, हे मुळापासून बंद व्हावे असे वाटत नाही का? असा सवाल त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

संभाजी भगत यांची फेसबूक पोस्ट (Facebook post by Sambhaji Bhagat)

नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते?? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण ….
ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे …नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये !!!

आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे!!

पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही , मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही ?? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत??

मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे , भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच ,पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्री कडे सुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात !! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्या पेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात!!बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात!!

स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच ,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धाया बाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !!

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3oHvr7z