Gautami Patil | मी पाटीलच आडनाव लावणार; आडनाव वादावर गौतमीची प्रतिक्रिया
Gautami Patil | विरार: आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. परंतु, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडते. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे. या वादावर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.
Gautami Patil said I will use Patil as my surname
विरारमध्ये माध्यमांची संवाद साधत असताना गौतमी म्हणाली (Gautami Patil), “मी पाटील आहे तर पाटीलच आडनाव वापरणार. कुणी काही बोललं तरी मला काही फरक पडत नाही. त्याचबरोबर मी कुणाची कसलीही बदनामी करत नाही. कुणाला माझ्या कार्यक्रमावर आक्षेप घ्यायचा असेल, तर त्यांनी आधी येऊन कार्यक्रम बघावं आणि मग बोलावं.”
Maratha organization warns Gautami Patil
गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावरून पुण्यात मराठा संघटनेची बैठक झाली. गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा या बैठकीमध्ये करण्यात आला आहे. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. गौतमी पाटील हे नाव वापरून पाटील यांची बदनामी करत आहे. तिने हे आडनाव लावू नये, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे.
अल्पकालावधीत गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिनेक्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी! नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे धाव
- Nitesh Rane | “हीच ती वेळ.. उरलेले दुकान बंद करायची..”; नितेश राणेंचा टोला नेमका कुणाला?
- Weather Update | हवामान खात्याने दिली मान्सूनबद्दल मोठी अपडेट! जाणून घ्या
- Nana Patole | ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…
- Gautam Gambhir IPL 2023 | व्हायरल फोटोवर युजर्स म्हणतात गौतम गंभीरची होऊ शकते हकालपट्टी
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3BUi3Qy
Comments are closed.