Gautami Patil | “मी महाराष्ट्राची संस्कृती…”; गौतमी पाटीलचं छोटा पुढारी घनश्याम दरोडेला सडेतोड उत्तर

Gautami Patil | पंढरपूर: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहायला मिळते. मात्र, ती तिच्या डान्समुळे कायम वादात सापडते. तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडे (Chhota Pudhari Ghanshyam Darode) याने गौतमी पाटीलवर टीका केली होती. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, असं छोटा पुढारी घनश्याम दरोडेनं म्हटलं होतं. गौतमी पाटीलने त्याच्या या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

छोटा पुढारी घनश्याम दरोडे याच्या टीकेला प्रत्युत्तर देत गौतमी पाटील म्हणाली, “मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. त्याचबरोबर मी मागच्या गोष्टी सोडून दिल्या आहे. तुम्हाला विरोध करायला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाही का? माझा कार्यक्रम पाहा  आणि मग आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा? मला या प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे.”

बार्शीमध्ये झालेल्या वादावर गौतमी पाटीलने स्पष्टीकरण दिलं आहे. “मी कार्यक्रमाला वेळेत पोहोचले होते. मी कोणत्याही कार्यक्रमात वेळेत जाते. त्याचबरोबर आयोजक जेव्हा सांगतात तेव्हाच मी स्टेजवर जाते. आयोजकांनी बार्शीमध्ये टिकीट लावून कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात माझं काय चुकलं आहे?”, असा सवाल देखील तिने यावेळी उपस्थित केला.

छोटा पुढारी घनश्याम दरोडे नक्की काय म्हणाला? (What exactly did Chota Pudhari Ghanshyam Darode?)

घनश्याम दरोडेचा मुसंडी हा चित्रपट येत आहे. यामुळे पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यासाठी तो आला होता. त्यावेळी घनश्याम दरोडेने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, “गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल”. याचप्रमाणे जी महाराष्ट्राची लावणी आहे, त्या लावणीला लावणीचं राहू द्या त्याला अश्लीलतेच रंग चढवू नका, अशी मी विनंती करतो.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3C1flJj