शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये घमासान; अजित पवार म्हणाले…

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे, असाही ते म्हणाले.

तसेच मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. शशिकांत शिंदे यांना रांजणे यांच्याकडून अवघ्या एका मतानं पराभव पत्करावा लागला आहे. शशिकांत शिंदे यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी पराभवाचा धक्का दिल्याचं सध्या साताऱ्यात बोललं जात आहे.

त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “दगडफेकीची घटना घडल्यानंतर मी साताऱ्याच्या एसपींशी संपर्क साधला. दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणत्याही निवडणुकीत यश अपयश असते. सगळेच निवडून येतात असे नाही. सहकार क्षेत्रातील निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. साताऱ्यात जे पॅनल झाले होते त्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक होते. त्यामुळे निवडणुकांमध्ये विजय-पराभव होतच असतो, असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा