InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गिरीश बापटांच्या प्रचारासाठी गडकरी, मुंडे घेणार पुण्यात सभा

पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, भाजपकडून देखील बापट यांचे परिचय पत्रक घरोघरी पोहचवण्याचे काम पूर्ण होत आले आहे, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, पंकजा मुंडे यांच्या सभांचे आयोजन पुण्यामध्ये केले जाणार असल्याचं, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले आहे.

भाजपकडून संपूर्ण पुणे लोकसभा मतदारसंघात २०० कोपरा सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र अद्याप एकही कोपरा सभा पार पडलेली नाही. याबद्दल विचारल असता, प्रचार फेरी, कोपरा सभा, मोठ्या सभांना परवानगी मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरु आहे, मात्र एक चौक तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने पोलीस परवानगी मिळवण्यात अडचण येत असल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान, सर्व परवानग्या मिळवून कोपरा सभा घेतल्या जातील, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.