InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुण्याच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढणार : गिरीश बापट

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे.

गिरीश बापट यांनी शहरातील व्यापारी, हॉटेल मालक तसेच रिक्षाचालक संघटनांच्या सदस्यांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुणे शहरात सध्या वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढणार असल्याच विधान त्यांनी यावेळी केले. गिरीश बापट हे प्रचारासाठी विजयरथ, पोवाडे, पथनाट्य या माध्यमांचा वापर करत आहेत. त्यामुळे मतदार त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

गिरीश बापट यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या महायुतीच्या प्रचार कार्यालयात शहरातील रिक्षा चालकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ‘माझ्या राजकीय जीवनात कोणतीही अपेक्षा न ठेवता अनेक सामान्य व्यक्तींना मी मदत करत आलोय. रिक्षा चालक हा त्यापैकी एक घटक आहे. अनेक रिक्षाचालकांच्या अडचणी मी सोडवल्या आहेत. त्यामुळे रिक्षा चालक हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.भविष्यात मी रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वर्षाला १२ रुपये खर्च करून रिक्षा चालकांसाठी विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे’ असं मत व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.