Girish Mahajan | “एकनाथ खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?”; गिरीश महाजनांचा खळबळजनक सवाल

Girish Mahajan | जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे Eknath Khadse) आणि भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद चांगलाच पेटताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी गेल्यावेळी टीका करताना, ‘बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही’, असे वक्तव्य केले होते. यावर उत्तर देताना मात्र त्यावर गिरीश महाजन यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मला दोन मुली आहेत हे मात्र माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं, त्याच उत्तर खडसे यांनी द्यावं”, असं महाजन म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली होती की त्याचा खून झाला होता, याचा तपास केला पाहिजे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, “मला जास्त बोलायला लावू नका. त्यामध्येच एकनाथ खडसे यांचे भले आहे. खरंतर मला याबाबत बोलायचे नाही. पण आपल्या मुलाचं नेमकं काय झालं, याचं उत्तर एकनाथ खडसे यांनी द्यावे.”

“एकनाथ खडसे आजकाल काय बोलताहेत त्याच भान त्यांना नाही. ते आता बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उभे राहून हातात दगड घेतात, कधी मला चावट म्हणतात, माझ्याबद्दल वाटेल तसं ते बोलत आहेत. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे”, असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केलीय.

“भोसरी प्रकरण जिल्हा दूध संघ प्रकरण यासारख्या अनेक त्यांच्या चौकशा सुरू आहेत. त्यात सबळ पुरावे मिळाल्याने एकनाथ खडसे अस्वस्थ झाले आहेत. एकनाथ खडसे साहेब हे मुख्य पदाच्या लेव्हलचे आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. मात्र असं असतानाही ते कमरेखालची भाषा बोलत आहेत”, असे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.