Girish Mahajan | मिलींद नार्वेकरांनी अमित शहांना शुभेच्छा देताच गिरीश महाजन म्हणाले – “शिवसेनेत नाराज…”

Girish Mahajan | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर पक्षात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. अशातच मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे. एवढंच नाही तर याबाबत भाजप (BJP) गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मिलिंद नार्वेकर यांचे अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत असं म्हणत मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर हे नाराज आहेत, शिवसेनेत कोण राहील कोण जाईल हे सांगता येत नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दिवाळीनिमित्त एकनाथजी, देवेंद्रजी आणि राज ठाकरे एकत्र आले होते. याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही. पण राजकारणात काहीही अशक्य नसतं. मनसे बाबत पक्षश्रेष्टी काय तो निर्णय घेतील असं महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई महापालिकेत यावेळी भाजपाचीच सत्ता येईल, असं भाकीत गिरीश महाजनांनी केलं आहे.

दरम्यान, मा. गृहमंत्री श्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. सर्वशक्तिमान परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो, असं ट्विट नार्वेकरांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.