Girish mahajan | “राऊतांच्या तोंडाला लगाम नाही, एक जागा जिंकली म्हणजे मोठा तीर नाही मारला”
Girish Mahajan | मुंबई : दोन दिवसांपूर्वी कसबा निवडणूक पार पडली. या निवडणुकीची चर्चा दोन दिवसांनंतरही सुरूच आहे. अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार मतांनी विजयी मिळवला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यावर आपलं नाव कोरले आहे. या विजयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
Sanjay Raut’s statement
संजय राऊत म्हणाले, “इतके दिवस शिवसेना भाजपबरोबर असल्यामुळे भाजपचे बालेकिल्ले भक्कम होते. आता खरी शिवसेना कुठे आहे हे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीत भाजपचे सर्व बालेकिल्ले ताब्यात घेऊ”, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यावर गिरीश महाजनांनी संजय राऊत यांचे कान टोचले आहेत. गिरीश महाजन म्हणाले, “संजय राऊत यांच्या जिभेला काही हाड नाही, त्यांनी एक जागा जिंकली म्हणजे तीर मारला नाही,” अशी प्रतिक्रिया महाजनांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
“त्यांच्या तोंडाला लगाम नाही”
राऊतांच्या टीकेवर महाजन म्हणाले, “ते आता बेछूट सुटले आहेत. सकाळी उठून ते शिव्या घालतात, कुणालाही काहीही बोलतात. त्यांच्या जिभेला हाड नाहीये, त्यांच्या तोंडाला लगाम नाही. एक जागा जिंकली म्हणजे त्यांनी काही तीर मारला नाही. या निवडणुकीत शिवसेना काय दिवे लावणार आहे हे त्यांनी दाखवावे.” अशी खोचक टीका गिरीश महाजनांनी केली.
महत्वाच्या बातम्या-
- Chandrashekhar Bawankule | “मला वाटतं पवारांनी तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील”; बावनकुळेंचा खोचक सल्ला
- MPSC Recruitment | एमपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Chandrakant Patil | ‘हू इज धंगेकर’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना धंगेकरांबद्दल विचारल्यावर बोलती बंद
- Morning Walk | नियमित मॉर्निंग वॉक केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
Comments are closed.