Girish Mahajan । एकनाथ खडसेंना एवढं नाटक करण्याची गरज नव्हती”; ‘त्या’ प्रकरणावरून गिरीश महाजन यांचा टोला

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आक्रमक झाले. संघात झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एकनाथ खडसे जळगाव पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनाला बसले. मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याने खडसेंनी अधिकाऱ्याला चक्क हात जोडून अधिकाऱ्याला उद्देशून मी तुमच्या पाया पडतो गुन्हा दाखल करा, अशी विनंती केली. खडसेंच्या या आंदोलनाची बरीच चर्चा झाली. यासंदर्भात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे.

ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्यांचे जाबजबाब घेतल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतीलच, त्यामुळे पाच-सहा दिवस वाट बघायला हवी. त्यासाठी गुन्हा नोंदवून घेण्यासाठी एवढे नाटक करण्याची एकनाथ खडसे यांना गरज काय? असा सवाल करत भाजप नेते आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर निशाणा साधला.

दूध संघाच्या गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जिल्हा दूध संघातील चोरी, अपहार प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी एकनाथ खडसे यांनी तब्बल नऊ ते दहा तास शहर पोलिस ठाण्यात आंदोलन केले. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील गैरव्यवहाराबाबत सुरवातीला तक्रार दिली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना सुचले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. पोलीस चौकशी करत असतानाही गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांचे नाटक सुरू आहे.

दरम्यान, शिंदे सरकारने एकनाथ खडसे यांचं पोलीस संरक्षण काढून घेतलं आहे. तब्बल ३१ वर्षानंतर अचानकपणे एकनाथ खडसे यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढली. ज्यांनी खोके घेतले आहेत त्यांची सुरक्षा काढण्यासाठी तत्परता दाखवावी असं आव्हान खडसेंनी दिलं. एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर चांगलीच आगपाखड केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.