Girish Mahajan | “माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा…” ; शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

Girish Mahajan | जळगाव: पुण्यामध्ये झालेल्या शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. “पुरस्कार सोहळ्यात बोलताना माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं म्हणत गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे. या गोष्टीचं आता राजकारण करू नये, असं देखील ते यावेळी म्हणाले आहे. अमोल मिटकरी यांनी गिरीश महाजन यांच्या हा एकेरी उल्लेख निदर्शनास आणून दिला होता.

त्यावर गिरीश महाजन आणि स्पष्टीकरण दिले आहे. स्पष्टीकरण देत असताना ते म्हणाले आहे,”महाराजांचा अनादर करायचा माझा हेतू नव्हता. मी महाराजांचा किती समर्थक आणि अनुयायी आहे हे सर्वांनाच चांगल्या प्रकारे माहित आहे. शेवटी ते महाराज आहे. त्यांच्या नावाचा माझ्याकडून चुकून एकरी उल्लेख झाला होता. त्याबद्दल मी माफी मागतो.”

विरोधकांना विकासावर बोलता येत नाही, म्हणून ते असे विषय काढून टीका करत असतात. असं म्हणतं गिरीश महाजन यांनी अमोल मिटकरी यांना टोला लगावला आहे. अमोल मिटकरी यांनी गिरीश महाजन यांनी एकेरी उल्लेख केल्याची बाब निदर्शनात आणून दिली होती. त्यानंतर गिरीश महाजन यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, जळगावमध्ये गिरीश महाजन यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

पुण्यामध्ये झालेल्या या क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात गिरीश महाजन यांच्या समवेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या