माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद आणखीनच चिघळत चालला आहे. आत एकनाथ खडसे यांनी पुन्हा नव्याने गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजन यांचाच हात असल्याची माहिती मला कालच समजली, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर नवा बॉम्बगोळा टाकून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच आहे. हे मला कालच समजलं, असं सांगतानाच मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केलं.

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर मला भाजपमधील नीच आणि गद्दार कोण हे समजलं आहे. मी चाळीस वर्ष जीवाची पर्वा न करता भाजपमध्ये काम केलं. त्याच गद्दारांनी माझ्यावर अन्याय केला. हे गद्दार कोण आहेत हे एकदा गुगलवर सर्च करून पाहा. टरबूज सर्च करा मग कळेल गद्दार कोण?, असं म्हणत नाथाभाऊंनी फडणवीसांचां नाव न घेता फडणवीसांवर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा