सचिन तेंडुलकरच्या लेकीने ग्लॅमरस अंदाज; अभिनेतेही झाले घायाळ

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सचिन तेंडुलकर सोबतच त्याची मुलगी सारा तेंडुलकर देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकतंच साराने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या तिच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये आहे. साराचे इन्स्टाग्रामवर १४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सारा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. सारा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करताना दिसते.

साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लंडनमधील एक फोटो अपलोड केला आहे. यात ती काळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो पोस्ट करत तिने “All smiles in this city” असे कॅप्शन दिले आहे. साराच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असून अभिनेता कार्तिक आर्यन आणि अरमान मलिक यांनीही हा फोटो लाइक केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा