Glycerine | रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने लावा ग्लिसरीन, चेहरा होईल मुलायम आणि चमकदार

Glycerine | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक शतकांपासून ग्लिसरीनचा वापर केला जातो. स्किन केअर प्रॉडक्टमध्ये देखील ग्लिसरीनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ग्लिसरीनमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. ग्लिसरीनचा नियमित वापर केल्याने त्वचा हायड्रेट राहते. त्याचबरोबर कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी ग्लिसरीन उपयुक्त ठरू शकते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने रात्रीच्या वेळी ग्लिसरीनचा वापर करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी खालील पद्धतीने ग्लिसरीनचा वापर केल्याने त्वचा चमकदार आणि मुलायम होऊ शकते.

ग्लिसरीन आणि पाणी (Glycerin and water-For Skin Care)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरीन आणि पाणी चेहऱ्याला लावू शकतात. ग्लिसरीन चेहरा खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा मुलायम आणि कोमल होते. ग्लिसरीन आणि पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला ग्लिसरीन आणि पाणी मिक्स करून घ्यावे लागेल. हे मिश्रण साधारण तीन ते चार मिनिटे तुम्हाला चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

ग्लिसरीन आणि कोरफड (Glycerin and aloe vera-For Skin Care)

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरीन आणि कोरफडीचे मिश्रण चेहऱ्याला लावू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा ग्लिसरीनमध्ये एक चमचा एलोवेरा जेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावी लागेल. दररोज रात्री झोपताना या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा सुंदर आणि मुलायम होऊ शकते. त्याचबरोबर या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

ग्लिसरीन आणि गुलाब जल (Glycerin and rose water-For Skin Care)

चेहरा चमकदार आणि मुलायम बनवण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब जल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा ग्लिसरीनमध्ये दोन चमचे गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण 25 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील डाग दूर होऊ शकतात.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने ग्लिसरीनचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात चिकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

ग्रीन टी (Green tea For Sticky Hair)

केसांमधील चिकटपणा दूर करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये ग्रीन टी मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण 30 मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने टाळूची पीएच पातळी नियंत्रणात राहते. उन्हाळ्यामध्ये नियमित या मिश्रणाचे वापर केल्याने केसातील चिकटपणा सहज दूर होऊ शकतो.

मुलतानी माती (Multani mati For Sticky Hair)

मुलतानी माती आपल्या त्वचेसोबतच केसांसाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटं केसांना आणि टाळूला लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना मुलतानी माती लावल्याने चिकटपणा दूर होऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.