InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नवविर्वाचित मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 20 आमदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले तर, 15 आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केले.

भाजपाच्या 11, महाराष्ट्र गोमांतकच्या 3, गोवा फॉरवर्डच्या 3 आमदारांसह 3 अपक्षांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. तर काँग्रेसच्या 14, एनसीपीच्या (चर्चिल) एका आमदारानं ठरावाच्या विरोधात मतदान केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.