“या सगळ्यांचे गॉडफादर उद्धव ठाकरे”, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप!

मुंबई : शिवसेनेच्या अटक झालेल्या आणि चौकशी होत असलेल्या नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाची कशी जोडली जातात? सचिन वाझेंचे गॉडफादर कलानगर मध्ये आहेत काय ? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय. शिवसेना नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी जोडली जात आहे. या सगळ्यांमध्ये शिवसेना हीच कॉमन लिंक आहे.

२०१९ मध्ये एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. सांगायचा मुद्दा हाच की शिवसेनेची या प्रकरणाशी काय कॉमन लिंक आहे. वाझेंचे गॉड फादर कलानगर ला बसले आहेत काय?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्वीट करून हा आरोप केला आहे.

“अँटिलिया स्फोटकं प्रकरण किंवा मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटक होणारा किंवा चौकशी केली जाणारा प्रत्येक जण शिवसेनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित कसा असतो? हा फक्त योगायोग असू शकत नाही! आणि तरी देखील आपण विचार करतोय की यांचा गॉडफादर कोण असेल? ते उद्धव ठाकरे आहेत!” असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे. कधीकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते राहिलेले नारायण राणे यांच्या पुत्राकडूनच हा आरोप झाल्यामुळे त्यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा