Gogoro Electric Scooter | तैवान मधील ‘हि’ इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतामध्ये होणार लाँच
टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक स्कूटर Electric Scoote कार Car इत्यादी वाहनांची मागणी वाढत चालली आहे. ही परिस्थिती पाहता अनेक परदेशी कंपन्या भारतीय बाजारपेठेचे दार ठोकताना दिसत आहे. भारतीय कंपन्यांचे अनेक परदेशी कंपन्या भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहे. यामध्ये तैवानची कंपनी गोगोरो Gogoro ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर भारतामध्ये लाँच करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतातील Hero Motocorp च्या मदतीने कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या योजनेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 3 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या या योजनेबद्दल अधिक माहिती सांगणार आहेत.
ग्राहकांची गरज लक्षात घेऊन लाँच होणार ही इलेक्ट्रिक स्कूटर Electric Scooter
गोगोरो 3 नोव्हेंबर रोजी आपल्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च बद्दल माहिती सांगणार आहे. अद्याप या स्कूटरच्या लॉन्चिंग बद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. कंपनी आपली ही इलेक्ट्रिक स्कूटर B2B या सेगमेंट मध्ये लॉन्च करेल.या स्कूटरसाठी कंपनीने व्हिवा हे नाव ट्रेडमार्क केले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 kW हब-माउंट मोटरसह सक्षम आहे. ही स्कूटर एका चार्ज मध्ये 85 किमी पर्यंत धावू शकते. आणि त्याचबरोबर ही स्कूटर 30km प्रतितास वेगाने चालवता येईल.
या तंत्रज्ञानासह ही स्कूटर लाँच होऊ शकते
गोगोरोने आधी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी भारतात आपली ही नवीन स्कूटर बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानासह लाँच करू शकते. हे तंत्रज्ञान हिरो कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या विडा इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देखील असू शकते. गोगोरो भारतात आल्यानंतर स्मार्ट एनर्जी, अर्बन मोबिलिटी आणि डी-कार्बोनायझेशन यासारख्या क्षेत्रात काम करेल.
गोगोरो इलेक्ट्रिक स्कूटर Gogoro Electric Scooter फीचर
गोरची ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक आकर्षक फीचरसह बाजारात उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने LED लाइटिंग, स्मार्टफोन-सक्षम LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल, दोन राइड मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि कीलेस इग्निशन इत्यादी गोष्टींचा समावेश असेल.
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Patil । “त्यांना आता साक्षात्कार झाला आहे”; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर चंद्रकात पाटलांची टीका
- Job Alert | राज्यातील पोलीस दलात ‘या’ पदांसाठी लवकरच सुरू होणार भरती प्रक्रिया
- Chandrakant Patil | “मातोश्रीमध्ये राहुनच माणसांची दु:ख कळतात. मात्र…”; ठाकरेंच्या दौऱ्यावरुन चंद्रकात पाटलांचा हल्ला
- Urfi Javed | कॅसेटचा गाणे ऐकण्याव्यतिरिक्त असाही उपयोग करता येतो, पाहा उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ
- Uday Samant | ‘टाटा एयरबस’ प्रकल्पावरून होणाऱ्या टीकेला उदय सामंतांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.