गोकुळ दुधसंघ सतेज पाटलांनी खेचून आणलाच, महाडिक गटाला १७-४ ने दणका !

कोल्हापूर : संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. २५००कोटींची उलाढाल असणाऱ्या गोकुळची निवडणुक यंदा अधिक चर्चेत होती कारण महाविकासआघाडीचे आमदार,खासदार एकत्रितपणे कामाला लागले होते.दुसरीकडे भाजपने सुद्धा आपल्या सगळ्या नेत्यांना कामाला लावले होते

काल (४ मे) दिवसभर मतमोजणी सुरु होती. मात्र, आता शेवटी निकाल स्पष्ट झाला आहे. गोकुळ दूधसंघातील महादेवराव महाडिक गटाच्या तब्बल ३ दशकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. येथील एकूण २१ जागांपैकी तब्बल १७ जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर महाडिक गटाला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता येणार हे आता आता स्पष्ट झालं आहे. गोकुळसाठी २ मेला चुरशीने ९९.७८ टक्के इतकं झालं होतं. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले होते.अखेर सतेज पाटील गटाने गोकुळ ची सत्ता काबीज केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.