Gold Silver Rate Today । सोने खरेदीदारांना दिलासा! आता ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार सोने, पाहा नवीन दर

Gold Silver Rate Today । जर तुम्ही सोने (Gold) किंवा चांदी (silver) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता सोने आणि चांदी खूप कमी किमतीत खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. दरम्यान मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा या किमतीत घट झाली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खरेदीची उत्तम संधी आहे. जाणून घ्या नवीनतम किमती.

Today The Price Of Gold And Silver Decreased

गुडरिटर्न्सनुसार, या महिन्याच्या सुरुवातीलाच 24 कॅरेट सोन्याचे दर 60,930 रुपये इतके होते. त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. 15 जून रोजी सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त होऊन 59,820 रुपयांवर पोहोचल्या आहेत. यानंतरही दरात घसरण सुरूच असून आता हे दर 58,900 रुपयांवर आले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त सोनेच नाही तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. (Gold Silver Rate Today) 21 जून रोजी एक किलो चांदी 73,000 रुपये होती.त्यानंतर हा भाव 71,900 रुपये किलो झाला. परंतु मागील आठवड्यात चांदीत जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली असून दोन दिवसांत एक हजारांची वाढ झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात (International markets) किमतीत बदल झाला की सराफा बाजारातील किमती बदलत असतात.

महत्वाच्या बातम्या :

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43Wk4YV