शेतकऱ्यांना अच्छे दिन; १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला . केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ केली असून, धान्यांच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणा, नापिकी आणि दुष्काळाने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला मोठा दिलासा मिळणार आहे.

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. धान्यांच्या किमान आधारभूत किंमतीत २०० रुपयाने वाढ करून १८०० रूपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. दहा वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. या आधी २००८ – ०९मध्ये यूपीए सरकारने १५५ रुपयांची वाढ केली होती.

त्याशिवाय १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या एमएसपीमध्ये ९०० रुपयांवरून २,७०० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ३३, ५०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. विशेष म्हणजे वाढवण्यात आलेल्या एमएसपीचे मूल्य जीडीपीच्या ०.२ टक्के आहे. तर अतिरिक्त खर्चात धानासाठी १२,३०० कोटी रुपये खर्च होणार आहे.

अनुदानित गॅस सिलेंडर ७, विना अनुदानित सिलेंडर ७४ रुपयांनी महागला

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार

महत्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.