शुभेच्छा मीराबाई चानूला पण, फोटो इंडोनेशियाईच्या वेटलिफ्टरचा; अभिनेत्री टिस्का चोप्रा झाली ट्रॉल 

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पदकाचं खातं उघडलं आहे. या स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्य पदक पटकावलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी मीराबाईला शुभेच्छा देत पोस्ट शेअर केल्या आहे. अभिनेत्री टिस्का चोप्राने देखील मीराबाईला शुभेच्छा देत ट्विट शेअर केले. पण आता टिस्काला तिच्या या ट्विटमुळे अनेकांनी ट्रोल केलं आहे.

टिस्काने ट्विटमध्ये मिराबाईचा फोटो शेअर करत शुभेच्छा ट्विट केले आहे की, ‘आम्हाला तुझा अभिमान वाटतो. @mirabai_chanu #Tokyo2021 #Olympics2021 #indiaattheolympics. ‘या ट्विटसोबत टिस्काने मीराबाईचा फोटो शेअर करण्याऐवजी इंडोनेशियाईची वेटलिफ्टर आइसा विंडी कैंटिकाचा फोटो शेअर केला. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

एका नेटकऱ्याने कमेंट केली, ‘या मीराबाई नाहित. या इंडोनेशियाईची वेटलिफ्टर आहेत ज्यांनी कांस्य पदक जिंकले’. तर दुसऱ्याने कमेंट केली ‘या मीराबाई नाहित कृपया आपलं ज्ञान वाढवावे.’

मीराबाई चानूने क्लिन आणि जर्कमध्ये 115 किलो वजन उचललं तर स्नॅचमध्ये 87 किलो वजन उचललं. तिने एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदकावर नाव कोरलं. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पटकावल्यानंतर खरंच स्वप्न पूर्ण झाल्याचं तिने म्हटलं आहे. रौप्य पदक देशाला अर्पण करत आहे. तसंच या प्रवासात पाठिंबा दिलेल्या सर्व भारतीयांचे आभार चानूने मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा