खुशखबर : प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई?

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका आणि निक जोनस यांच्या घटोस्फोटाच्या चर्चा होत्या. या चर्चा बंद होतात की नाही तेवढ्यात आता प्रियांका प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत. लवकरच हे जोडपे पालक होत आहेत. प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याचेही सांगितले जात आहे. हे जोडपे आपल्या मुलाबद्दल खूप आनंदी आणि उत्साहित आहे. मात्र, अद्यापही प्रियांका किंवा निक यांच्याकडून यावर काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पती निक जोनासचे आडनाव हटवल्यानंतर तिच्या घटोस्फोटाच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, प्रियांकाने ‘आश्चर्यकारक! मला तुझ्या कुशीत मरायचं आहे.’ अशी निकच्या एका व्हिडीओला कमेंट करत घटोस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा