खुशखबर : गायिका शाल्मली खोलगडे अडकली विवाहबंधनात

मुंबई : प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेनं प्रियकर फरहान शेखशी लग्नगाठ बांधली आहे. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत या दोघांनी लग्न केलं. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं असून मित्रपरिवारासाठी ते १ डिसेंबर रोजी रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत.

फरहान आणि शाल्मली गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. फरहान हा मिक्सिंग आणि मास्टरिंग इंजीनिअर आहे. शाल्मली आणि फरहान यांना लग्नाचा गाजावाजा नको होता, म्हणून त्यांनी घरीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी माध्यमांशी बोलताना दिली. शाल्मलीला नोंदणी पद्धतीनेच लग्न करायचं होतं. पण आईवडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी घरी वैदिक पद्धतीने लग्न केलं. यावेळी फक्त १५ जण उपस्थित होते. घरच्या घरीच साध्या कपड्यांमध्ये दोघांनी लग्न केलं.

शाल्मलीने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. यामध्ये परेशान (इशकजादे), दारू देसी (कॉकटेल), बलम पिचकारी (ये जवानी है दिवानी) या गाण्यांचा समावेश आहे. याशिवाय इंडियन आयडॉल ज्युनिअर, सूर नवा ध्यास नवा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक म्हणून सहभागी झाली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या