आनंदाची बातमी : कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत विशेष एसटी बस सेवा सुरु !

मुंबई महानगर क्षेत्रात कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी विशेष एसटी बसेस सुरु करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या सोमवारपासून पनवेल, डोंबिवली, विरार या ठिकाणाहून विशेष एसटी बसेस सुरु करण्यात येणार आहे, असेही अनिल परब यांनी सांगितले.

महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी 15 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. या मागणीनंतर अवघ्या तीन दिवसात अनिल परब यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना विशेष बससेवा सुरु केली जाणार आहे. महिलांची ने-आण करण्यासाठी एसटीने त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार पनवेल-मंत्रालय, डोंबिवली-मंत्रालय आणि विरार-मंत्रालय या मार्गावर महिला विशेष बस चालवल्या जाणार आहे. येत्या सोमवारी 21 सप्टेंबरपासून या बस फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील, असे एसटी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.