InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दंड भरण्यापासून वाचवेल गुगुल मॅप्स

- Advertisement -

गुगलने आपलं लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप ‘गुगल अॅप्स’च्या अँड्रॉइड व्हर्जनसाठी एक नवं फीचर आणलं आहे.

या ‘स्पीडोमीटर’ फीचरच्या मदतीने तुम्ही किती वेगाने गाडी चालवत आहात याबाबत कळेल.

- Advertisement -

हे फीचर ‘गुगल मॅप्स’ या अॅपच्या ‘सेटिंग्स’ मेन्यूमध्ये उपलब्ध आहे. तेथून हे फीचर सुरू करता येईल. या नव्या फीचरआधीच ‘गुगल मॅप्स’ने सर्व युजर्ससाठी ‘स्पीड लिमिट’ हे फीचर रोलआउट केलं आहे.

भारतातील अनेक शहरांमध्ये स्पीड कॅमेरे लागले आहेत, त्यामुळे ‘गुगल मॅप्स’चं हे फीचर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस आणि दंड भरण्यापासून वाचवेल. नव्या स्पीड लिमिट फीचरमुळे युजर्सना एखाद्या रस्त्यावरील ठरलेली वेगमर्यादा कळेल आणि याच आधारे जर ड्रायव्हरने कमाल वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी नेण्याचा प्रयत्न केला तर ‘स्पीडोमीटर’ फीचरद्वारे अलर्ट मिळेल.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.