गुगलकडून डुडलच्या माध्यमातून कामिनी रॉय यांना सलाम

गुगलने आज गुगल डुडल सादर केलं आहे. बंगाली कवयित्री, स्त्रीवादी समाजसुधारक कामिनी रॉय यांना डुडल समर्पित केलं आहे. महत्वाचं म्हणजे कामिनी रॉय या ब्रिटीशांच्या राज्यात पदवी संपादन करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. आज कामिनी रॉय यांची 155 वी जयंती आहे.

12 ऑक्टोबर 1864 रोजी तत्कालीन बंगालच्या बाकेरगंज जिल्ह्यातील बासंदा गावात त्यांचा जन्म झाला. कामिनी रॉय यांनी महिलांच्या अधिकारासाठी लढा दिला. 1883 साली रॉय यांनी बेथूने येथे शिक्षण घेतलं. रॉय या पहिल्या महिला आहेत ज्यांनी ब्रिटीश इंडियामध्ये शिक्षण घेतलं आणि त्या पदवीधर झाल्या. 1886 साली कोलकाताच्या बेथूने महाविद्यालयात संस्कृतमधून बीए ऑनर्स पदवी घेतली आहे. आणि त्यानंतर तेथेच शिकवू लागल्या.

रॉय यांचा जन्म बंगालीतील श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडिल चांदीचरण सेन हे न्यायाधीश आणि लेखक होते. ब्राम्हो समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. रॉय यांचा भाऊ कोलकातामध्ये मेयर असून बहिण नेपाळच्या शाही कुटुंबात फिजिशियन होत्या. कामिनी रॉय यांना लहानपणी गणितात रूची होती. पण पुढे त्यांनी संस्कृतमध्ये पदवी घेतली. कॉलेजमध्ये त्यांची ओळख अबला बोल यांच्याशी झाली. अबला महिला शिक्षण आणि विधवांकरता काम करत असतं. त्याने प्रभावित होऊन कामिनी रॉय यांनी आपलं आयुष्य महिलांच्या हक्कांकरता अर्पण केलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.